जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती (बार्डी)शाळेचा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
शाळेच्या खेळ पैठणीचा उपक्रमांतर्गत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग वर्षा वसेकर पैठणीच्या मानकरी
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष रामदास माळी यांच्या शुभहस्ते आणि उपाध्यक्ष प्रवीण कवडे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वसेकर रमेश वसेकर.बिभिषण वसेकर.नामदेव माळी सुधामती माळी.शालन खारे. मुख्याध्यापक किरण ढोबळे सहशिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे मान्यवर ग्रामस्थांच्या उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न झाले.या नंतर विद्यार्थ्यांची भाषणे विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम कवायत.आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास माळी यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना वह्या आणि पेनचे वाटप करण्यात आले . सहशिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी मनोगतातून शाळेची प्रगती अतिशय सुंदर रित्या चालू असून अगदी मनापासून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी झटत आहोत.असच सहकार्य पालकांनी सहकार्य करावे सांगितले.
यावेळी पालक आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.शेवटी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भविष्यकाळात मिळण्यासाठी खेळ पैठणीचा यामध्ये संगीत खुर्ची हा उपक्रम महिलांसाठी राबवून सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आणि या संगीत खुर्ची या स्पर्धेत वर्षा समाधान वसेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावत जि.प.प्राथ.वाफळकरवस्ती शाळेच्या वतीने एक पैठणी भेट देण्यात आली. सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पालकांचं पदाधिकाऱ्यांचं आणि वस्तीवरील सर्व ग्रामस्थांचं भरभरून सहकार्य यासाठी मिळालं.