पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विवेक वर्धिनी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय या प्रशालेच्या वतीने मतदान जनजागृती ,संविधान जागृती, कॉपीमुक्त अभियान विषयांच्या या अनुषंगाने भव्य अशा विद्यार्थ्यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणअधिकारी सचिन जगताप यांनी केले. यावेळी प्रशालेचे प्राचार्य डॉ. मुंढे यु.आर, ज्येष्ठ शिक्षक अशोक पवार, विलास दराडे व प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या रॅलीमध्ये महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊ, या थोर राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषेमध्ये प्रशालेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.
त्याचबरोबर देशभक्तीपर गीत, आदिवासी नृत्य ,शेतकरी नृत्य अशा विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमही विद्यार्थ्यांनी सादर केले. तसेच संपूर्ण शहराच्या विविध भागांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या जनजागृती होईल अशा घोषणा दिल्या.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.