भाकरी उद्योग मेळाव्यात 1 लाख भाकरी बनविण्याचा संकल्प
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
ड्रीम फाउंडेशन राजमाता जिजाऊ भाकरी केंद्र चाणक्य गुरुकुल आणि श्री सिद्धेश्वर भोजनालय यांच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती राजमाता जिजाऊ जयंती स्वामी विवेकानंद जयंती व युवा दिनानिमित्त आयोजित पहिले राज्यस्तरीय भाकरी स्पर्धेचे बक्षीस समारंभ शनिवार दिनांक 18 जानेवारी सुरभी हॉल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले या स्पर्धेत राज्यभरातील 375 महिलांनी सहभाग नोंदवला होता व दोन दिवसात त्यांनी 17000 भाकरी बनवण्याचा विक्रम केला हे भाकरी श्री सिध्देश्वर मंदिर आणि कलबर्गी येथील भारतीय संस्कृती उत्सव कार्यक्रम मध्ये मोफत देण्यात आले,महिलांनी
दोन तासात सर्वाधिक भाकरी व गोल आणि पातळ भाकरी बनवणाऱ्या स्पर्धक महिलांना पहिले बक्षीस अकरा हजार रुपये आहेर असे बक्षीस होते या स्पर्धेत सौभाग्यवती मंदाकिनी जमादार व राजश्री नागठाण यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्यांनी पहिल्या फेरीत 92 भाकरी 92 भाकरी 82 भाकरी करून प्रथम क्रमांक पटकावला समारंभ व भाकरी उद्योगातील महिला संधी यावर कार्यक्रमास महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला ,यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मनोरमा मल्टीस्टेटच्या चेअरमन सौ शोभा मोरे, वेदमूर्ती बसवराज शास्त्री सोमेश्वर मठ, निवृत्त सहायक पोलीस आयुक्त दीपक आर्वे, शोभाश्री मल्टीस्टेटचे व्यवस्थापक किरण पुजारी,धूत सारीचे संचालक धूत साहेब गायक लोंढे संयोजक काशिनाथ भातागुनकी सौ गजराबाई भतगुनकी आदी उपस्थित होते
यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना शोभा मोरे यांनी महिलांनी भाकरी उद्योगात मोठे यश मिळवावे काळाची गरज ही भाकरी असून लोकांना चांगले भाकरी देणे महत्वाचे आहे.
सोलापूरच्या भाकरीला देशात आणि परदेशात मागणी असून सोबत चटणी व भाजी विक्रीतून मोठं उद्योग उभे राहील त्यासाठी ड्रीम फाउंडेशन पुढाकार घेतल्यास मनोरमा परिवार नक्की मदत करेल असे ही त्या म्हणाल्या.
काशीनाथ भतगुनकी यांनी प्रास्ताविक केले त्यात त्यांनी भाकरी स्पर्धा घेण्या मागील उद्देश सांगितला व रोज 1 लाख भाकरी बसविण्यासाठी 500 महिलांना रोजगार संधी उपलब्ध असेल याचा सर्वांनी लाभ घ्यावा या कार्यक्रम मध्ये मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन झाले
भाकरी स्पर्धेत दुसरे क्रमांक कविता राठोड व सावित्री जाधव यांनी पटकाविला,तृतीय क्रमांक नंदिनी पांढरे ,प्रभावती पुजारी यांनी,चौथे क्रमांक सविता बंडगर,सरस्वती क्षीरसागर यांनी तर पाचवे क्रमांक सविता पाटेकर सुवर्णा पुजारी यांनी मिळविले उत्तेजनार्थ बक्षीस राजश्री हिरेमठ,अनिता जमादार व गीता वारे यांनी पटकाविला,विजेत्यांना एकूण 26 रुपये रोख बक्षीस, मानाचा आहेर सन्मानचिन्ह,सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
सहभागी महिलांना लकी ड्रा द्वारे 25 साडी,9 पैठणी,10 हिटर,5 हेडफोन 1 मोबाईल असे विशेष बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला सर्वांना कौटुंबिक हुरडा पार्टी देऊन स्वागत करण्यात आले
स्वागत निमंत्रक व संयोजक संगीता पाटील यांनी केले तर सूत्रसंचलन राहुल उपाध्ये यांनी आभार वागमोडे सरांनी मानले,स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पद्मा ठावरे सुरेखा कोडगी भाग्यश्री गायकवाड श्रीदेवी बिराजदार ,गीता भतगुनकी आदींनी परिश्रम घेतले