वडूज प्रतिनिधी तेज न्यूज
वडूज, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथे श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी नामदेव मंदिराचे बांधकाम श्रीराम मंदिराचे मागील बाजूस, मुख्य बाजारपेठ, वडूज येथे चालू आहे. सदर मंदिरासाठीची जागा वडूज येथील कांबळे कुटुंबियांकडून श्री नामदेव शिंपी समाज ट्रस्ट, वडूज यांचे नावे विनमोबदला रजिस्टर बक्षीस पत्राने नोंदणी करून देण्यात आली आहे.
मंदिराचे बांधकाम प्रगतीपथावर असून उर्वरित बांधकामासाठी अजूनही बऱ्याच आर्थिक निधीची आवश्यकता आहे, तरी सर्व श्री संत नामदेव शिंपी समाज बांधवाना आवाहन करण्यात येत आहे की सामाजिक बांधीलकी म्हणून सदर मंदिर बांधकामासाठी आपण सर्वांनी यथाशक्ती आर्थिक योगदान देऊन या सत्कार्यास आपलाही सहभाग नोंदवावा अशी नम्र विनंती करण्यात आली आहे.
आपण आपली आर्थिक मदत रोखीने अथवा ऑनलाईन पद्धतीनेही देऊ शकता, आपल्या रकमेची रिसीट (पावती) आपणास लगेचच पाठवून दिली जाईल.
श्री संत नामदेव शिंपी समाज ट्रस्ट, वडूज.(सौं. संगीता कांबळे, वडूज )मोबाईल - 7588685701.इच्छुक देणगीदार आपले आर्थिक योगदान वरील मोबाईल नंबरवर गुगल पे ने पाठवू शकतात.