पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कोर्टी ता. पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज मधील त्रितिय वर्ष स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये शिकत असलेल्या अभिषेक देवरे यास भाभा अणुसंशोधन केंद्र यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील निबंध स्पर्धेत डॉ. ए. के. गांगुली बेस्ट एस्से अवॉर्ड, तृतीय क्रमांक मिळाल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर निबंध मागविण्यात आले होते. एस. के. एन. सिंहगड कॉलेज मधील अभिषेक देवरे याने "रेडिएशन तंत्रज्ञानाचे फायदेशीर परिणाम आणि भारतीय अणुकार्यक्रम" या विषयावर ७५० शब्दमर्यादेचा निबंध या स्पर्धेसाठी जमा केला होता. या निबंधास राष्ट्रीय स्तरावरील त्रितिय क्रमांक मिळाला. सदर पारितोषिकाचे वितरण इंडियन असोसिएशन फॉर रेडिएशन प्रोटेक्शन यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ३५ व्या राष्ट्रीय परिषदेत दिनांक २९ जानेवारी २०२५ रोजी मेंगलोर विद्यापीठ, मंगळुरु, कर्नाटक येथे होणार आहे. यासाठी प्रकाशन अधिष्ठाता डॉ. संपत देशमुख व डॉ. दिपक गानमोटे यांनी समन्वयक म्हणून काम पहिले.
यासाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, सर्व विभाग प्रमुख तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिषेक देवरे याचे हार्दिक अभिनंदन केले.