सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स इंन्टरनॅशनल ३२३४ डी.१ बुधवार दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 7.30 वाजता सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदिरामध्ये आपल्या प्रांताच्या 8 व्या प्रांतीय परिषदेचा OFFICIAL CALL माजी प्रांतपाल ला.डॉ.व्यंकटेश यजुर्वेदी, प्रांतपाल ला.ॲड. एम. के. पाटील यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.
यावेळी प्रांतीय सचिव ला. डॉ. अभिजित जोशी, प्रांतीय खजिनदार ला. महेश नळे, प्रांतीय सहसचिव ला.डॉ. श्रीपाद कुलकर्णी, झोन चेअरमन ला. विठ्ठल सारंगी- ला.नंदिनी जाधव- ला. डॉ. शरद पाटील(बार्शी)- ला. विवेक परदेशी(पंढरपूर); तसेच क्लब अध्यक्ष ला.दिनेश बिराजदार, ला. बाळप्पा बेद्रे, ला. शलाका कुलकर्णी; क्लब सचिव ला. देवेंद्र बिराजदार, ला.सोमशेखर भोगडे; क्लब खजिनदार ला. रोहन बिराजदार व ला.राहुल साखरे (बार्शी) व ला. गंगाप्रसाद बंडेवार, उपस्थित होते.