पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
समाज परिवर्तनासाठी स्त्री शिक्षण या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन संस्थापक सचिवा मा.सौ. सुनेत्राताई विजयसिंह पवार यांचे कुशल मार्गदर्शनाखाली पंढरीतील रुक्मिणी विद्यापीठाच्या मातोश्री ईश्वराम्मा विद्यालयात रंगला माजी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा..
यावेळी प्रथम शाळेची घंटा वाजवून मुलींनी शाळेत प्रवेश केला. पुढे गणरायाची विधिवत पूजा व आरती करून या स्नेह मेळाव्यास सुरुवात केली.
परवीण कोतवाल या विद्यार्थिनीच्या अमृतवाणीने सर्वांना मंत्रमुग्ध करत गुरुवर्यांना वंदन करून गुरुवर्यांचा यथोचित मानसन्मान केला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या नंदिनी गायकवाड उपस्थित होत्या.
मुली कितीही मोठ्या झाल्या तरी आपली शाळा आणि तेथील आठवणी नेहमी मनात घर करूनच जात असतात याचाच प्रत्यय मातोश्री ईश्वराम्मा विद्यालयाच्या माजी विद्यार्थीनींच्या स्नेह मेळाव्यात आला.जुन्या अनेक आठवणीत शाळेच्या इयत्ता दहावीच्या 1997 व 98 च्या मुली एकत्र येऊन रमल्या होत्या.गुरुंनी दिलेली शिस्त ,चिकाटी, सचोटी यामुळेच आज आम्ही जीवनात यशस्वी झाल्याचे माजी विद्यार्थिनींनी मनोगतात व्यक्त केले .
प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी या उत्तम गृहिणी बरोबर लघुउद्योजिका ,कृषी अधिकारी ,ग्रामसेवक तर आहेतच व वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी आपला नावलौकिक केला आहे.या मेळाव्यास माजी शिक्षिका व मुलींनी उपस्थिती दर्शवत प्रशाले वरील प्रेम व्यक्त केले.
या कार्यक्रमास मुलींनी प्रशालेस क्रीडा साहित्य देऊ केले .या दिलेल्या वस्तूंचा अंतकरणपूर्वक स्वीकार करून सर्व शिक्षकांनी भविष्यात त्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाचा समारोप केला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परवीण कोतवाल यांनी केले तर आभार यांनी मांडले
या कार्यक्रमास सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचाऱ्यां बरोबर शीला गवळी ,रूपाली देठे,वर्षा जाधव ,संगीता डिसले, करुणा साळुंखे,संजीवनी जाधव, स्वाती अभंगराव, विद्या माने, सत्यशीला आखाडे ,साधना पाटील, संजीवनी कसगावडे, मनीषा सोनटक्के, नीता बनसोडे, वर्षा जाधव ,मनीषा पवार,रेवती बेलपत्रे याही उपस्थित होत्या