पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये पोलीस पाटील दिनानिमित्त पंढरपूर तालुका व पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांना कायदा सुव्यवस्थेच्या कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले.
तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टीवाय मुजावर पोलीस उपनिरीक्षक भोसले सह पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत पोलीस पाटील दिनाचे औचित्य साधून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये कायदा व सुव्यवस्थेचा अनुषंगाने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचे ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पोलीस पाटलांसाठी पाठवलेले प्रशंसापत्र हद्दीतील सर्व पोलीस पाटलांना प्रशस्ती प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
पोलीस पाटील दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले तसेच सर्व महिला व पुरुष पोलीस पाटलांना स्नेहभोजन देण्यात आले.