सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स इंन्टरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब सोलापूर सिटीच्या वतीने करंजकर विद्यालय तुळजापूर वेस येथे सोलापूर चित्रकला, रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष लायन मोहन भूमकर यांनी पाहुण्यांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना बक्षिसे वाटप करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष म्हणून शंकर पाटील महेश बँक संचालक तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री, भीमाशंकर करंजीकर, सराफ व्यापारी, श्री वासुदेव नल्ला उद्योजक, श्री प्रकाश कलघडगे, श्री सुनील पत्तेवार, श्री जगदीश इप्पल पल्ली, श्री सोमशेखर भोगडे सचिव लायन्स क्लब सोलापूर व्टीन सिटी सोलापूर, मुख्याध्यापिका सौ राजश्री तडकासे मॅडम, पर्यवेक्षक श्री पवार सर, श्री शंकर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्ष मोहन भूमकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिले. शिक्षक, शिक्षिका,विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन सौ राजश्री तडकासे यानी केले.