पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगाव येथे जिल्हा परिषद गादेगाव केंद्रातील सर्व शाळांमध्ये कबड्डी ,लंगडी ,खो खो ,धावणे या स्पर्धेचे केंद्रस्तरीय आयोजन करण्यात आले होते.
यावेळी केंद्रप्रमुख आप्पासाहेब माळी, गादेगावच्या सरपंच सीमा बागल ,संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे ,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बागल ,मनसेचे तालुका उपाध्यक्ष अनिल बागल, ग्रामसेवक जयंत खंडागळे ,माजी उपसरपंच भजनदास पवार ,मुख्याध्यापक चंद्रकांत बागल, विद्याधर भोसले, सहशिक्षक वर्षाराणी मोरे, शितल बागल ,शीतल मस्के ,लीना बागल, सोमनाथ भूईटे ,नियाज मुलाणी ,अजय मोरे ,दीपक देशमुख ,राजेंद्र मोलाणे, अविनाश कदम , वैभव पाटील ,विजय शिंदे , कुलकर्णी , महादेव बागल, मिसाळ सर, परमेश्वर घोडके , निलेश कांबळे, महेश वास्ते , कोच सागर सुर्वे,चंद्रकांत रोकडे , अवताडे मॅडम ,कोळपे मॅडम ,माने मॅडम आदी शिक्षक उपस्थित होते.
यावेळी टाकळी, कोर्टी ,गादेगाव ,उपरी, वाखरी आदी शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा उत्साह दिसून येत होता. विद्यार्थ्यांना ग्रामसेवक खंडागळे, अनिल बागल ,संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे, कदम यांनी क्रीडा क्षेत्राविषयी मार्गदर्शन केले .
यावेळी शिवरत्न ज्युनिअर कॉलेजमधील कृष्णा शिंदे हा भारतात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्याचा सन्मान करण्यात आला.सर्व ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी शुभेच्छा देऊन आभार मानले