पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली संलग्न महाराष्ट्र राज्य कार्यकारणी पदाधिकारी महत्त्वपूर्ण मीटिंग दिनांक 27 डिसेंबर शुक्रवार 2024 रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री केशवराव (नामदेव महाराज मंदिर) येथे सकाळी १०: वाजता प्रदेशाध्यक्ष अँड महेश ढवळे यांच्या अध्यक्षते खाली व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ नानासाहेब पाथरकर केशराज संस्थेचे अध्यक्ष रुपेश खांडके सेक्रेटरी धनंजय जवजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत खालील विषयांवर महत्वपूर्ण मीटिंग चे आयोजन करण्यात आलेले आहे.
मीटिंग चे महत्वपूर्ण विषय
१) मागील प्रोसेसिंग वाचून कायम करणे
२) नुकत्याच महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या संत नामदेव महाराज आर्थिक विकास महामंडळ या विषयावर सविस्तर चर्चा विनिमय करणे
*३) श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर संगोपन दुरुस्ती यावर चर्चा विनिमय केशवराज संस्थेच्या पदाधिकाऱ्यासोबत चर्चा*
४) क्षेत्र पंढरपूर येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे स्मारक याबाबतचा पाठपुरावा
५)अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाच्या संघटन वाढीसाठी महाराष्ट्राचा दौरा करून संघटन वाढवणे
*६) केंद्र व राज्य शासनाकडे शिंपी समाजाच्या प्रलंबित मागण्यांविषयी महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून याविषयी चर्चा विनिमय करून निर्णय घेणे*
७) जुलै २०२५ मध्ये संत नामदेव महाराजांचा६७५ वा संजीवन समाधी सोहळा पंढरपूर येथे भव्य प्रमाणात घेण्याबाबत चर्चा व निर्णय
८) भारतातील समस्त शिंपी समाजाच्या जनगणना व संघटन शक्ति साठी लवकरच श्री क्षेत्र पंढरपूर येथे गाव, शहर ,तालुका, जिल्हा, राज्य चे समाज अध्यक्ष असलेल्या समाज अध्यक्षांचे संमेलनाचे आयोजन करणे
*९) अध्यक्षांच्या परवानगी आयत्यावेच्या विषयांवर चर्चा व निर्णय*
सदर मीटिंग वेळेवर सुरुवात होईल गणपूर्ती अभावी कोरम पूर्ण झाल्यावर लगेच त्याच ठिकाणी अर्ध्या तासाने मीटिंग आयोजित करण्यात येईल तरी या मिटींगला अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष , व केशवराज संस्था व संलग्नित संस्था अध्यक्ष यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.