"खेळखंडोबा माशिचा"
भाग पाच
वेतन व
भविष्यनिर्वाह निधी,कर्ज घोटाळा
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी व नोकर वर्गाचे वेतन व भविष्य निर्वाह निधी खाते ऑनलाईन झाल्याने सर्व काही व्यवहार पारदर्शक पद्धतीने होत आहेत.राज्यातील माध्यमिक शाळा यांचे वेतन सादर करताना काही संस्था जाणीवपूर्वक उशिराने सादर करतात.त्यामुळे प्रत्येक महिन्यात एक तारखेला वेतन अदा करण्याचा कायदा पारित झाला असला तरीही पे युनिट मधून उशिराने बिले पास केली जात आहेत.पास झालेली बिले कोषागारात जाणे तिथून जाणीवपूर्वक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत पगार पाठवले जातात. यामागे ही मोठं गौडबंगाल असून सरकारी बँकेत खाते ठेवण्यास संस्था तयार होत नाहीत कारण मुलांच्या विविध निधी व योजना बनावट सह्यांचा वापर करून काढल्या जातात.या कार्यात सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक सामील आहेत.उशिरा पगार शुक्रवारी जमा केला जातो शनिवार रविवार सुटी येते. केवळ तीन दिवस उशीर झाल्याने कर्मचारी मात्र अनेक बँकांचे व्याज दिवसाला भरत राहतो.तो मुख्याध्यापक खाते जमा होऊन नंतर वितरण होते.यामध्ये काही लिपिक रजेवर असणे,सही न करणे अशा अनेक बाबी मधून चार ते पाच दिवस घालवले जातात.नंतर बुधवार गुरुवार पगार काढायला कर्मचारी जातात दरम्यान काळातील व्याज मात्र नाहक भुर्दंड शिक्षक यांचेवर पडत राहतो.इतर कर्जे बँक,पतसंस्था, विमा, यांच्या कपाती उशिराने पाठवल्या जातात.
वेतन खात्यात पाठवला जाणारा भविष्य निर्वाह निधी हा अजूनही ऑफ लाईन लिहिला जात असून त्याचे साधे आकडे वारी ही दिली जात नाही.काही अडचणी साठी फंड काढताना लिपिक व मुख्याध्यापक संगनमताने टक्केवारी ठरवून रक्कम काढून देत आहेत.
या खात्यातून अनेक मातब्बर मुख्याध्यापक यांनी लाखो रुपये भरलेले नसतांनाही अनेक वेळा बनावट कागद पत्रांनी फंड काढून घेतला आहे की ज्याची नोंदही कुठे ठेवली गेली नाहीय.तेथील रजिस्टर मधील पाने ही गहाळ केली जात असतात.काहीनी तर उघडे पडल्यावर बघू म्हणून लाखो रुपये हडप केले आहेत.तर प्रामाणिक कर्मचारी व शिक्षक यांना मात्र वेठीला धरले जाऊन हक्काचा फंड ही मिळू दिला जात नाही.
आपल्या पगारातून कोणतीच कपात नाही असे बनावट पगार पत्रके सादर करून अनेक मुख्याध्यापक अनेक बँका व पतसंस्था यांची भली मोठी कर्जे शिक्षक यांना सक्तीने जामीन करून घेऊन प्लॉटिंग व शेती व्यवसाय बंगले बांधणे, वाहने खरेदी करणे यासाठी लाखो रुपये उधळत आहेत.हे सर्व हप्ते शिक्षक खडणी,बोगस अनुदाने यातून भरून स्वतःचे प्रपंच करताना इतरांना वेठीस धरत आहेत.
अशा संस्था चालक मुख्याध्यापक यांची कसून चौकशी केल्यास महाराष्ट्र मधील मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस येणार आहे.याबाबत शासनाने वेळीच लक्ष घालून सर्व पदाधिकारी यांची पूर्ण आर्थिक माया तपासणी करावी.शिक्षण सारख्या पवित्र क्षेत्रात न शिकवता वर्षानुवर्षे पगार काढून स्वतःचे घरे भरणाऱ्या संस्था चालक मुख्याध्यापक यांच्यावर काय कारवाई होणार याकडे संपूर्ण ग्रामीण भागातील पालकांचे लक्ष लागले आहे.
क्रमशः