मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर धर्मवीर मीना यांच्या कुर्डूवाडी येथील वार्षिक स्टेशन इन्स्पेक्शन करण्याच्या निमित्ताने आगमन झाले. त्यांची आमदार अभिजित पाटील यांनी भेट घेऊन मतदारसंघातील विविध ठिकाणी रेल्वे सुविधेबाबत सविस्तर चर्चा करून जनहिताच्या मागण्या पोहोचविल्या आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी कार्यालयीन आदेश देण्यात यांची मागणी केली.
सकारात्मक चर्चेतील महत्त्वपूर्ण मुद्दे :
१) मोडनिंब येथे कार्गो टर्मिनल बाबत सविस्तर चर्चा झाली. अंतिम टप्प्यातील प्रक्रिया वेगाने सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा माल कमी वेळेत आणि कमी खर्चात बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्यास सहकार्य होईल.
२) माढा - वडशिंगे महातपूर उड्डाणपुलाबाबत मागणी केली. त्यातील दोन पूल बांधणी बाबत मान्यता मिळाली असून व एकाचे सर्वेक्षण करण्याचे आश्वासन दिले.
३) माढा रेल्वे सुशोभीकरण करण्याबाबत व स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, प्रतीक्षालय (वेटिंग रूम) अशा सर्व सुविधांच्या बाबत मागण्या केल्या.
४) पंढरपूर - मुंबई आठवड्यातून तीन वेळा रेल्वे आहे, ती रोज सुरू करावी अशी मागणी केली. प्रत्येक शनिवार रविवार मुंबई ते पंढरपूर - टू टायर -थ्री टायर डबे वाढवावे, अशी मागणी केली.
५) माढा रेल्वे स्टेशनवर कोरोना काळाच्या आधी सर्व रेल्वे गाड्या थांबत होत्या, परंतु आता फक्त दोनच गाड्या थांबतात. पूर्वीप्रमाणे सर्व गाड्या थांबल्यास सर्व प्रवाशांची सोय होईल. याबाबत सविस्तर चर्चा करून मागणी करण्यात आली.
६) कोरोना काळाच्या आधी सांगोला येथे कृषी रेल सुरू होती व ती आता बंद आहे ती पुन्हा सुरू करावी अशी मागणी करण्यात आली.
७) रेल्वे परिसरातील सर्व जागा विकसित करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
चर्चा सविस्तर झाली असून सर्वच मागण्यांबाबत ते सकारात्मक आहेत. त्यांच्या सहकार्याने प्रवाशांना आणि विशेषकरून शेतकरी बांधवांना विशेष लाभ होणार आहे. कार्य पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील.