वाडी कुरोली प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ,छत्रपती संभाजीनगर रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजितऑल इंडिया रोलर रिले स्केटिंग चॅम्पियनशिप व गोवा स्केटिंग नॅशनल फेस्टिवल सिलेक्शन ट्रायल कॉम्पिटिशन स्पर्धा आज पंढरपूर येथे संपन्न झाली.
या स्पर्धेत रायझिंग स्टार पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.
ज्ञानदा कमलकिशोर काळे -गोल्ड मेडल,
विराज नितीन लामकाने- सिल्वर मेडल,
वेदांत दत्तात्रय कदम- ब्रांझ मेडल
शिवतेज सत्यवान काळे -ब्रांझ मेडल संपादन केले. या सर्व खेळाडूंचे गोवा स्केटिंग नॅशनल फेस्टिवलसाठी सिलेक्शन झाले आहे.
वरील सर्व खेळाडूं व मार्गदर्शक क्रीडाशिक्षक रवी ओवाळ सर यांचे संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव काळे , सचिव बाळासाहेब काळे गुरुजी, प्राचार्य गीतांजली खाडे सर्व शिक्षक बंधू-भगिनी पालक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.