पं.राजेंद्र कुलकर्णी बासरीवादनाने आणि पं.संजय गरुड यांच्या दमदार गायनानी पहिला दिवस गाजवला
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतातीच्या प्रचार आणि प्रसारासाठी आणि नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पं.विकास कशाळकर फाऊंडेशन यांचे वतीने दोन दिवशीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी मा.उमेश मालक परिचारक बोलत होते.
सुरुवातीला आदरणीय उमेश मालक परिचारक मान्यवर कलाकार आणि डॉ प्रसाद कुलकर्णी ज्ञानेश्वर दुधाणे आण्णासाहेब सुरवसे उदय उत्पात. एस पी कुलकर्णी. माधूरीताई जोशी. स्वानंदी काणे.यांचे शुभहस्ते संगीत महोत्सवाचे दीपप्रज्वलन होऊन उद्घाटन करत कार्यक्रमाला सुरुवात झाली.त्यामध्ये उमेश मालक परिचारक यांनी सांगितले की पंढरपूर नगरीला शास्त्रीय संगीताचा वारसा मोठा आहे आणि तो वारसा कशाळकर फाऊंडेशन च्या माध्यमातून पुढे चालत असून यातून पंढरपूर येथे नवोदित कलाकार निर्माण व्हावेत त्याद्वारे पंढरपूर नगरीचा नावलौकिक वाढेल असे सांगून शुभेच्छा देत नेहमी सहकार्य राहील असे आश्वासन दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ प्रसाद कुलकर्णी यांनी करत कार्यक्रमाला सुरुवात झाली.
प्रथम सत्रात आंतरराष्ट्रीय किर्तीचे ख्यातनाम बासरीवादक पंडित राजेंद्र कुलकर्णी यांनी राग श्री सादर करत पहिल्यांदा आलाप जोड झाला सादर केला.त्यानंतर झपताल आणि तीन तालात अप्रतिम द्रुत गत सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले.
शेवटी दादऱ्या मधील गत वाजवली त्यांना तितकीच सुंदर साथसंगत तबला ऋषिकेश सुरवसे पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे यांनी दिली.दुसऱ्या सत्रात किराणा घराण्याचे ख्यातनाम गायक पं.संजय गरुड यांच्या दमदार गायनाला सुरुवात झाली त्यामध्ये सुरुवातीला त्यांनी राग कलाश्री बडा ख्याल विलंबित एकतालामध्ये धन धन मंगल गावो.बंदिश आणि मिश्र निर्वाणी मधील ठुमरी बलमवा तुम क्या जानो प्रीत अप्रतिम सादर करत अतिशय सुंदर पहाडी आवाज आणि तितकीच मधूरता आलाप ताना यांची अनुभूती रसिकांना अनुभवायला मिळाली त्यानंतर भिमसेन जोशी यांचा अजरामर अभंग जो भजे हरि को सदा या भैरवीने कार्यक्रमाची सांगता केली.त्यांना तितकीच सुंदर साथसंगत तबला रोहन पंढरपूरकर हार्मोनियम तुषार केळकर पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे टाळ निषाद गरुड स्वरसाथ ओजस अंबिके.यांनी केली.सुंदर सुत्रसंचलन राजेश खिस्ते यांनी केले.आभार उदय उत्पात यांनी मानले.अप्रतिम ध्वनी व्यवस्था आरती साऊंड सिस्टीम यांनी केली.या कार्यक्रमाला पंढरपूर व पंढरपूर पंचक्रोशीतील कलासाधक आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संगीत महोत्सव यशस्वी करण्यासाठी माधुरीताई जोशी.आण्णासाहेब सुरवसे.एस पी कुलकर्णी.स्वानंदी काणे.धनंजय मनमाडकर.प्रज्ञा कुलकर्णी.भगवान भाऊ मनमाडकर.सुधीर भोरकर.ओजस अंबिके.सिध्देय पुरवत.श्रीरंग जाकी.अनिरुध्द कुलकर्णी.मिहीर देशपांडे आदींनी अधिक परिश्रम घेत आहेत.