भारतरत्न भिमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांना करणार पखवाज साथसंगत
करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
अभिजात शास्त्रीय संगीताची पंढरी म्हणून ओळखला जाणारा जागतिक किर्तीच्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची सुरुवात दिनांक १८ डिसेंबर पासून सुरू होत असून पाच दिवस चालणाऱ्या या ७० व्या संगीत महोत्सवात ख्यातनाम आंतरराष्ट्रीय किर्तीच्या ख्यातनाम गायक गायिका आणि वादकांच्या उपस्थितीत हा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव संपन्न होणार असून याच संगीत महोत्सवात शुक्रवार दिनांक २० डिसेंबर रोजी दुसऱ्या सत्रात भारतरत्न भिमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांचे बरोबर करकंब (पंढरपूर) येथील ज्ञानेश्वर दुधाणे पखवाज साथसंगत करण्याची संधी पं.श्रीनिवासजी जोशी आणि शिल्पाताई जोशी यांचे मुळे मिळत असून एका ग्रामीण भागातील कलाकाराला ही संधी अतिशय महत्त्वपूर्ण असून आपल्या नावाबरोबर करकंब गावचही नाव उज्ज्वल होत आहे.
या आधीही ६३ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवात पं.शौनक अभिषेकी.यांचेबरोबर साथसंगत केली असून महाराष्ट्र भर विदुषी मंजुषा ताई पाटील,पं.रघुनंदन पणशीकर.पं.जयतिर्थ मेऊंडी.पं.आनंद भाटे.आरतीताई अंकलीकर,पं.राहूल देशपांडे.पं.रोणू मुजूमदार आरतीताई अंकलीकर.अशा अनेक कलाकारांबरोबर पखवाज साथ संगत करण्याचे भाग्य लाभले असून महाराष्ट्रा बरोबर दिल्ली.छत्तीसगड.हरियाणा.कर्नाटक.गुजरात.आदी राज्यातही ख्यातनाम कलाकारांबरोबर पखवाज साथसंगत केली आहे.
पंढरपूर येथे पद्मश्री जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव.विठ्ल रुक्मिणी नवरात्री संगीत महोत्सव संगीत महोत्सव .पं.विकास कशाळकर फाऊंडेशन आयोजित संगीत महोत्सव चे आयोजन करण्यासाठीही मोठा सक्रिय सहभाग असतो.पेशाने प्राथमिक शिक्षक असून संगीता बरोबर शैक्षणिक.पर्यावरण.सामाजिक.आध्यात्मिक कार्याची ही आवड असणारे व्यक्तिमत्त्व असून आतापर्यंत ७०० मोठ्या झाडांचे यशस्वी वृक्षारोपण करुन झाडे जोपासना करत आहेत.सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवात मिळणारी ही मोठी संधी म्हणजे प्रत्येक कलासाधकाचे स्वप्न असते हा महोत्सव ऐकण्यासाठी भारतात बरोबर परदेशातूनही अनेक संगीत रसिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.अनेक मोठमोठे गायक वादक ह्या संगीत महोत्सव ऐकण्यासाठी हजेरी लावतात.कलासाधक आणि रसिकांची भेट आणि आचारविचारांची मोठी देवाणघेवाण या महोत्सवामुळे होते.त्यामुळे या संगीत महोत्सवात पखवाज साथ करण्याची संधी ही उर्जा आणि प्रेरणादायी आहे ज्ञानेश्वर दुधाणे यांनी सांगितले. विराज जोशी यांचे बरोबर तबलावादक पांडुरंग दादा पवार हार्मोनियम अविनाश दिघे टाळ माऊली टाकळकर करणार आहेत.विराज जोशी यांचे नंतर जागतिक किर्तीच्या गायिका कौशिकी चक्रवर्ती यांचे गायन होणार असून सर्व कला साधक आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आशिर्वाद द्यावेत हीच विनंती करण्यात आली आहे.