अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत गायन ऐकण्यासाठी रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पं.विकास कशाळकर फाऊंडेशन पंढरपूर आयोजित दोन दिवसीय संगीत महोत्सवात पं.मुकुल कुलकर्णी आणि गौरी ताई पाठारे यांच्या सुमधुर श्रवणीय गायनाने गाजला.
सुरुवातीला मान्यवर कलाकार आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे मुख्य लेखाधिकारी मुकेश आणेचा साहेब.डॉ अनिल जोशी.डॉ प्रसाद कुलकर्णी.ज्ञानेश्वर दुधाणे.राजेश खिस्ते.उदय उत्पात.आण्णासाहेब सुरवसे.माधुरीताई जोशी स्वानंदी काणे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन संपन्न झाले.
त्यानंतर मुकुल कुलकर्णी यांचे गायनाला सुरुवात झाली त्यांनी सुरुवातीला अभिजात शास्त्रीय संगीतातील राग शाम कल्याण जियो मेरो लाल त्याला जोडून अतिशय सुंदर बंदिश सुंदर सादर करत गुरु पं.अरुण कशाळकर यांची क्षणाक्षणाला आठवण करत पंढरपूरकर कला रसिकांना मंत्रमुग्ध केले त्यांनतर श्रावणाचे ते श्रवण घ्राणांचे ते घ्राण सुंदर अभंग सादर करत भक्तीमय वातावरण निर्माण केले त्यांना तबला साथ ऋषिकेश सुरवसे हार्मोनियम श्रीरंग जाकी पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे स्वरसाथ सुधीर भोरकर ओजस अंबिके यांनी केली.
दुसऱ्या सत्रात आंतरराष्ट्रीय किर्तीच्या ख्यातनाम गायिका विदुषी गौरी पाठारे यांच्या सुमधुर गायनाला सुरुवात झाली त्यांनी राग भुपाली विलंबित तीनतालात सादर करत त्याला जोडून गायिलेल्या या बंदिशीने पंढरपूर करांची मने जिंकली.आपले गुरु पद्मश्री जितेंद्र अभिषेकी पद्मा तळवलकर यांच्या तालमीत तयार झालेल्या गौरीताईंनी आलाप ताना अतिशय तयारीने सादर केल्या.शेवटी. एक झुला आणि विठल आमुचे जीवन या अभंगांने कार्यक्रमाची सांगता केली.त्यांना तितकीच सुंदर साथसंगत तबला पुष्कराज जोशी हार्मोनियम सुप्रिया जोशी पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे टाळ ओजस अंबिके यांनी केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन माधुरी ताई जोशी यांनी करत आभार एस पी कुलकर्णी यांनी मानले.
संपूर्ण संगीत महोत्सवात भगवान भाऊ मनमाडकर यांचे अतिशय मोलाचे योगदान मिळाले.हा संगीत महोत्सव यशस्वी करण्यासाठी डॉ प्रसाद कुलकर्णी ज्ञानेश्वर दुधाणे माधुरी ताई जोशी.राजेश खिस्ते उदय उत्पात.एस पी कुलकर्णी.धनंजय प्रज्ञा कुलकर्णी भैय्या मनमाडकर.स्वानंदी काणे.सिध्देय पुरवत.ओजस अंबिके.सुधीर भोरकर.अनिरुध्द कुलकर्णी.यांनी अधिक परिश्रम घेत महोत्सव यशस्वी केला.