पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष व पंढरपूर येथील विधिसेवा स्वयंसेवक,तेज न्यूज चे पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे यांची मुलांसाठी कायदेविषयक युनिट सेवा या जिल्हा पदावर अध्यक्ष जिल्हा व विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सोलापूर यांचे आदेशाने जिल्हा सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.
नंदकुमार देशपांडे हे अनेक वर्षापासून अखिल भारतीय ग्राहक पंचायत व पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे तसेच विधी स्वयंसेवक म्हणूनही पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयातील विधी सेवा समितीवर सेवक म्हणूनही कार्यरत आहेत. ही समिती जिल्ह्यातील मुलांसाठी कायदेशीर सेवा युनिट या माध्यमातून कार्यरत आहे. त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन मुलांसाठी कायदेशीर सेवा युनिट या जिल्हा समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीबद्दल त्यांचे तेज न्यूज चॅनल परिवाराकडून व अनेकांनी अभिनंदन केले आहे.