मांजरी प्रतिनिधी तेज न्यूज
दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी विद्यालयामध्ये बाजार डे चे आयोजन करण्यात आले होते. या बाजार डे चे उद्घाटन सांगोला तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती नारायण दादा जगताप, विद्यालयाचे मुख्याध्यापक दादासाहेब पवार व ग्रामस्थ यांचे शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला, खाऊचे पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते एकूण 42 स्टॉल उपलब्ध होते. यामधून विद्यार्थ्यांना व्यवहारी ज्ञान व तोंडी आकडेमोड करण्याचे समजले. विद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून विविध वस्तू खरेदी केल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.