पंढरपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य अन्न आयोग अध्यक्ष राज्यमंत्री (दर्जा) महेशजी ढवळे यांनी श्री नामदेव मंदिर पंढरपूरला भेट देऊन श्री केशवराज व श्री संत नामदेव महाराजांचे दर्शन घेतले.
त्यावेळी महेश ढवळे यांचा तेज न्यूज चॅनल चे संपादक प्रशांत माळवदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली.
त्या वेळेस उपस्थित हभप नामदास महाराज,अखिल भारतीय नामदेव क्षेत्रीय महासंघाचे अध्यक्ष डॉ.नानासाहेब पाथरकर,केशवराज संस्थेचे सचिव धनंजय जवंजाल ,मनोज भांडारकर,संतोष मुळे,गणेश उंडाळे, राजेश धोकटे , विलास पोरे , शशिकांत जवंजाळ, गणेश पतंगे इ. मान्यवर उपस्थित होते.