भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील केसकरवाडी येथील युवक सहिल मुजावर याची सैन्य दलात भरती झाल्या बद्दल माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी परिचारक म्हणाले की, भारतीय सैन्यात काम करण्याची आणि देशसेवा करण्याची अनेक युवकांची ईच्छा असते पण जिद्द, चिकाटी आणि ध्येयाने प्रेरित झालेल्या साहिल सारख्या फार मोजक्या युवांची ही ईच्छा पूर्ण होते...!
येथील साहिल महंमद मुजावर या युवकाची नुकतीच भारतीय सैन्य दलात निवड झालीये. मुजावर कुटुंबीयांच्या घरी भेट देवून साहिल भारतीय सैन्य दलात भरती झाल्याबद्दल अभिनंदन आणि सत्कार करून यशस्वी देशसेवेसाठी शुभेच्छा दिल्या.!!
यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी साहिल चे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.