जोगेश्वरी प्रतिनिधी तेज न्यूज उदय वाघवणकर
०३ डिसेंबर रोजी जोगेश्वरी विधानसभा आमदारअनंत नर यांनी जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनपा ट्रॉमा केअर रुग्णालय येथे रुग्णसेवेत असलेल्या कंत्राटी कामगार व रुग्णसेवेतील मोठ्या कमतरता व प्रशासनाची दिरंगाई या संदर्भात रुग्णालयातील वरिष्ठांशी चर्चा केली.
यामध्ये कंत्राटी कामगारांचे पगार वेळेवर न होणे, पेमेंट स्लीप न मिळणे, भविष्यनिधी, अपघात विमा अशाप्रकारच्या अनेक समस्यांचा पाढा यावेळीवाचून दाखवला.
तसेच अति - दक्षता विभाग (आयसीयू), शस्त्रक्रिया विभाग अशा रुग्णसेवेकरिता असलेल्या सुविधा देखील दुर्लक्षित पडल्या आहेत.अश्या प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित करून त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले.
कामगारांच्या विषयासंदर्भात कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंदवण्याकरिता जोगेश्वरी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले.यावेळी रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.