सातारा प्रतिनिधी तेज न्यूज
सातारा येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय योगा हॉल येथे सुजन फौंडेशन या संस्थेच्या वतीने दूसरे महाराष्ट्र कुस्ती संमेलन संपन्न झाले. समारंभाचे अध्यक्षस्थानी वस्ताद सोपानराव गोडसे होते. प्रमुख उपस्थिती म्हूणन उपमहाराष्ट्र केसरी साहेबराव जाधव, हिंद केसरी गणपतराव आंधळकर यांचे पुतणे दत्ताजीराव आंधळकर उपस्थित होते.
महिलांच्या हस्ते फीत कापून आणि जागतिक कीर्तीचे मल्ल ऑलम्पिक वीर श्रीरंग जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमांस शुभारंभ झाला.समारंभाचे स्वागताध्यक्ष पैलवान रवींद्र काकडे यांनी उपस्थित पैलवान, कुस्तीगीर, कुस्ती आखाडा प्रमुख व कुस्तीप्रेमीचे स्वागत केले.
याप्रसंगी कुस्ती खेळाकरिता आपले आयुष्य समर्पित केले. कुस्ती जगले कुस्तीच्या निकोप वाढीकरिता योगदान दिले. खेळाडू व कुस्तीगीर घडवले आशा व्यक्तींना राष्ट्रीय खलिफा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये पै. कुमारी प्रतीक्षा दशरथ सुतार मुळशी जिल्हा पुणे, क्रीडा शिक्षक सौ.पूजा संजय पाटील मिरज ,वस्ताद आयुब शेख आरण्यश्वर लाल माती कुस्ती आखाडा जामखेड,
वस्ताद-सचिन बनकर, जय हनुमान कुस्ती केंद्र, निमगाव केतकी इंदापूर वास्ताद- श्री मारुती माळी, रेंदाळ तालीम जिल्हा कोल्हापूर वस्ताद नजरुद्दीन नायकवडी, शिवछत्रपती पुरस्कार पहिले मानकरी,क्रीडाशिक्षकः श्री विष्णु आदनाक जामगाव ता.आष्टी जिल्हा बीड. यांना प्रदान करण्यात आले.
स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालावधीमध्ये कुस्ती या खेळाकरिता आपले आयुष्य वेचले असे जागतिक कीर्तीचे मल्ल ऑलम्पिक वीर श्रीरंग जाधव आप्पा क्षेत्र माहुली सातारा, यांचा सन्मान श्रीमती सुभद्रा जाधव व जाधव परिवार यांनी स्वीकारला.वस्ताद शंकरराव भाऊराव मदने, डिस्कळ यांना मरणोत्तर राष्ट्रीय खलिफा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी वीरेंद्र जाधव, अमर जाधव, प्रताप साळुंखे, पैलवान शंकरराव गमरे, रघुनाथ उगले, उद्धव साळुंखे, मल्हारी मदने, सलीम पठाण, पैलवान जस्मिन शेख नलवडेवाडी, सरपंच सुनंदा माळी पुसेसावळी, शिवानी सोनवणे नाशिक, सौ रुपाली निगुडे, सौ अरुणा जाधव सौ शिवांगी शिंदे , गोविंद पोळ तसेच सातारा,सांगली, पुणे,नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, बीड,सांगली व कोल्हापूर परिसरातील पैलवान बहुसंख्येने उपस्थित होते.जिल्हा क्रीडा कार्यालय यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित जाधव यांनी केले. सूत्रसंचालन संपतराव जाधव यांनी केले.आभार सौ सुरय्या नायकवडी यांनी मानले.