राज्यातील लाखो भाविकांच्या उपस्थितीत हेलीकॉप्टरने समाधीवर पुष्पवृष्टी सर्वांना ह्रदयस्पर्शी
पुणे प्रतिनिधी तेज न्यूज ज्ञानेश्वर दुधाणे
श्री संत ज्ञानेश्वर महाराज ७२८ वा संजीवन समाधी सोहळा महाराष्ट्र राज्यातील लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात संपन्न झाला.लाखो भाविकांनी दर्शन रांगेतून माऊलींच्या नामघोषात दर्शन घेत ले.पहाटेपासून परंपरागत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त विधिज्ञ राजेंद्रजी उमाप यांचे शुभहस्ते विधिवत पवमान अभिषेक पूजा संपन्न होऊन लाखो भाविकांच्या उपस्थितीत आणि नामदेव महाराज यांच्या वंशपरंपरेने कीर्तन संपन्न होऊन माऊलींच्या समाधीवर घंटानाद करत प्रथा परंपरेने चालत आलेल्या प्रथांचे पालन करत माऊलींच्या पुजारी यांच्या मंत्रघोषात हेलीकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावेळी हा आनंदसोहळा ज्ञानोबा माऊली या नामघोषात लाखो भाविकांनी याची देही याची डोळा अनुभवला.याचवेळी महाराष्ट्राचे माजी मंत्री चंद्रकांत दादा पाटील.आमदार विजय शिवतारे.आमदार संजय जाधव.तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमापजी.योगी निरंजननाथजी.ह.भ.प.भावार्थ देखणे.आरफळकर मालक,चोपदार.व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर.तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके.माधवी निगडे.शकुंतला नडगिरे.देहू संस्थानचे पुरषोत्तम महाराज मोरे माणिक महाराज मोरे.आदी मांडळी उपस्थित होते.यावेळी संत नामदेव महाराज पादुका आणि माऊलींच्या आभुषणांसहीत भेटीने वातावरण भक्तीमय झाले होते.
यावेळी हा समाधी सोहळा यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे कर्मचारी यांनी अधिक परिश्रम घेत आळंदी नगर परिषद.स्वकाम सेवा मंडळ.विठ्ठल सेवा मंडळ.आर्ट ऑफ लिव्हिंग चे सर्व सदस्य.यांनी स्वच्छता पाणी वाटप.देणगीसेवा तसेच स्वयंसेवक ज्ञानेश्वर दुधाणे यांच्या टीमने ही देणगी सेवा करत योगदान दिले.ज्ञानेश्वर महाराज संस्थान च्या वतीने दर्शन बारीत खिचडी वाटप आणि पाणी वाटप करण्यासाठी अधिक मोलाचं सहकार्य केले.