सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स इंन्टरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टिन सिटीचे क्लबच्या माजी अध्यक्षांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर झोन चेअरमन लायन सौ नंदिनी जाधव, सचिव लायन सोमशेखर भोगडे सर्व प्रथम क्लबचे विद्यमान अध्यक्ष ला . ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले. यावेळी सर्व माजी अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या व माजी अध्यक्षांच्या.मार्गदर्शनाखाली क्लबचे कार्य सुव्यवस्थित चालू आहे,असेच त्यांचे मार्गदर्शन मिळावे . तसेच माजी प्रांतपाल एम.जे.एफ लायन डॉ नारायणदास चंडक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उंच शिखरावर अग्रेसर आहे.
यावेळी क्लबचे माजी अध्यक्ष लायन नागेश बुगडे, माजी अध्यक्ष एम.जे.एफ.लायन सौ ममता बुगडे, माजी अध्यक्ष एम.जे.एफ लायन" डॉ राहुल चंडक,माजी अध्यक्ष लायन मुकुंद जाधव, माजी अध्यक्ष लायन नंदिनी जाधव, माजी अध्यक्ष जेष्ठ लायन सोमशेखर भोगडे,,माजी अध्यक्ष लायन सागर पुकाळे. यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला. यांचे क्लबचा वतीनेगुलाब पुष्प देऊन अध्यक्ष लायन ज्ञानेश्वर कुलकर्णी यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आले.
येथील लायन्स क्लब सोलापूरचे अध्यक्ष लायन ज्ञानेश्वर कुलकर्णी सचिव लायन सोमशेखर भोगडे, खजिनदार लायन प्रभाकर जवळकर व माजी अध्यक्ष, सभासद आदी उपस्थित होते.
कार्यकमांचे सुत्रसंचलन लायन प्रभाकर जवळकर यांनी केले .शेवटी क्लबचे सचिव सोमशेखर भोगडे यांनी आभार व्यक्त केले.
.