पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
बा विठ्ठला माझे लाडके भाऊ देवेंद्रजी मुख्यमंत्री व गोपीचंद कॅबिनेट मंत्री होऊ दे म्हणत महिलांनी चंद्रभागा नदीत आंघोळ करत ओल्या कपड्यात नदी पासून नामदेव पायरी पर्यत दंडवत घालत विठ्ठल रुक्माई ला साकडे घातले.
देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेल महिला व शेतकर्यांचे साठी केलल काम व गोपीचंद पडळकर लढत असलेली बहुजनांच्या साठी लढाई ला बळ मिळावे म्हणून देवेंद्रजी मुख्यमंत्री होणे व गोपीचंद पडळकर कॅबिनेट मंत्री होणे गरजेचे आहे.
तर आमच्या बहुजनांना महिला ना न्याय मिळेल महिला भगिनींनी सुरक्षित राहतील विठ्ठलाने एवढा आर्शिवाद द्यावा आम्ही भगिनीं प्रत्येक एकादशी दंडवत घालत तुझी सेवा करू असा निच्छय व्यक्त केला.
यावेळी विश्रांतीताई भुसनर ,सिमा भुसनर, जयश्री साळुखे,कोसल्या निळे, माऊली हळणवर ,सोमा ढोणे प्रसाद कोळेकर ,विक्रम तरंगे याचे सह पदाधिकारी उपस्थित होते.