सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने लायन्स क्लब सोलापूर मेट्रोच्या वतीने बी एम आय टी इंजिनिअरिंग कॉलेज बेलाटी, सोलापूर मध्ये युवकांमध्ये रस्ता सुरक्षेच्या दहा नियमांचे पत्रक वाटप करण्यात आले.
यावेळी लायन्स क्लब सोलापूर मेट्रोचे सदस्य लायन किरण कुलकर्णी यांनी रस्ता सुरक्षा विषयावर विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.
यावेळी बीएमआयटी कॉलेजचे डीन प्राध्यापक राहुल माने , प्राचार्य श्री जोशी ,प्राध्यापक फुलारे , प्राध्यापक झांबरे उपस्थित होते. यावेळी 300 विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा पत्रकांचे वाटप करण्यात आले.