मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
लोकसभेप्रमाणे या विधानसभा निवडणुकीत चिन्हाच्या घोळाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. मतदारांचा तुतारी आणि ट्रॅम्पेट या चिन्हांमध्ये गोंधळ उडाल्याचे निकालानंतर समोर आले आहे. चिन्हाच्या नामसाधर्म्याने शरद पवार गटाचे नऊ उमेदवार पराभूत झाले.
विधानसभेला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ८६ जागा लढवल्या होत्या. पैकी १० उमेदवार निवडून आले आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह दिले होते. लोकसभा निवडणुकीत ‘ट्रम्पेट’चे भाषांतर पिपाणी करण्यात आले होते. त्याचा दोन मतदारसंघांत पवार गटाला फटका बसला होता.
त्यानंतर पक्षाने ट्रम्पेट चिन्ह गोठवावे अशी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. आयोगाने ती फेटाळली. लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेट चिन्हाला मिळालेला प्रतिसाद पाहून विधानसभेला अनेक अपक्षांनी ट्रम्पेटची मागणी केली होती. तब्बल १६३ मतदारसंघांत ट्रम्पेट हे चिन्हे देण्यात आले होते.
ट्रम्पेट’मुळे माझा विजय वळसे पाटील
आंबेगाव मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील निवडून आले. वळसे पाटील यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आपल्याला ‘ट्रम्पेट’ चिन्हाने घेतलेल्या मतांचा लाभ झाल्याची कबुली दिली.
फटका कुठे बसला?
● जिंतूर मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार विजय भांबळे यांचा ४५५४ मतांनी पराभव झाला. ट्रॅम्पेट चिन्हावर उभ्या असलेल्या विनोद भावळे यांना ७४३० मते मिळाली.