पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर विधानसभा निवडणूक २०२४मध्ये मतदान टक्केवारी वाढण्यासाठी सर्व संस्थांनी प्रयत्न करावेत असे आवाहन पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले.
पंढरपुरातील विविध स्वयंसेवी संस्थांतर्फे मतदार जनजागृती अभियानांतर्गत सायकल,मोटार सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते,त्याच्या शुभारंभ प्रसंगी पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इथापे बोलत होते.
पंढरपूर शहरातील रोटरी क्लब,लायन्स क्लब,रनर्स असोसिएशन,अखिल भारतीय ग्राहक पंचायत, केमिस्ट असोसिएशन, इनरव्हील क्लब,श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम,सायकलर्स क्लब, पंढरपूर नगरपरिषद,सुर्योदय परिवार, आयएमए,निमा, इ. विविध स्वयंसेवी संस्थातर्फे शहरातील छ शिवाजी महाराज चौक, सावरकर मार्ग, इंदिरा गांधी चौक,भादुले चौक,प्रदक्षणा मार्ग या भागात सायकल व मोटार सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी नगर परिषदेचे उप मुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास, जिल्हा संघटक दीपक इरकल, जिल्हा सचिव सुहास निकते, तालुका संघटक महेश भोसले,तालुका उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे, सदस्य संजय खंडेलवाल, अंकुश वाघमारे, शाम तापडिया, तसेच केमिस्ट असोसिएशन तालुका अध्यक्ष प्रशांत खलिपे, रोटरी क्लब अध्यक्ष सोमेश गानमोटे, तसेच संघटनेचे सदस्य उपस्थित होते.