मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात कार्यालय अधीक्षक धनंजय बागडे यांचा सेवा निवृत्ती गौरव समारंभ दिनांक ३० नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे यांच्या हस्ते धनंजय बागडे यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांना पुष्पगुच्छ शाल श्रीफळ मानपत्र व संपूर्ण पोशाख देण्यात आला.
धनंजय बागडे यांनी प्रशासकीय कामकाजात दिलेले योगदान महत्त्वाचे असून त्यांची सचोटी व प्रामाणिकपणाने ३३ वर्ष ३ महिने काम केले. केलेल्या कामाचे समाधान मिळाले पाहिजे आणि यापुढे बागडे यांनी कुटुंबासाठी अधिक वेळ देऊन पुढील आयुष्य आनंदात व्यतीत करावे अशा शुभेच्छा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे यांनी दिल्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ च्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर नितीन घोरपडे यांनी बागडे यांचा अकाउंट मध्ये हातखंडा होता त्यांनी नवीन असलेल्या संगणक व ई टी एच प्रणाली अवगत करून त्यांचा प्रशासनात प्रभावीपणे वापर केला त्यांच्याकडून इतर महाविद्यालय मदत घेत होते आपण आपल्या कामात किती निष्णात असावे याचे उदाहरण म्हणजे बागडे आहेत असे सांगत त्यांच्या कामकाजाचा गौरव केला.
सत्काराला उत्तर देताना धनंजय बागडे यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने मला शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी दिली. विद्यार्थी हा केंद्रबिंदू म्हणून प्रामाणिकपणे काम केल्याचे सांगत त्यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केले.
याप्रसंगी हेमंत सावंत, युवराज शेवते, मेघना मॅडम, डॉ लतेश निकम, हरी सोळंकी, शंकर अळकुंटे, शिवाजी सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर आर वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर स्टडीज संचालक सचिन भारद्वाज उपप्राचार्य डॉ शुभांगी आवटे, डॉ प्रशांत मुळे, प्रा अनिल जगताप, प्रा विलास शिंदे तसेच शिक्षक शिक्षकेतर, इतर सेवक तसेच बागडे यांचा मित्रपरिवार व नातेवाईक उपस्थित होते. डॉ दत्तात्रय संकपाळ यांनी मानपत्राचे वाचन केले तर सूत्रसंचालन डॉ वंदना सोनवले यांनी केले आणि उपप्राचार्य डॉ प्रशांत मुळे यांनी आभार मानले.