मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
सेंट टेरेसा शाळा मुंबई येथे २६ नोव्हेंबर संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला.यावेळी शिक्षिका रोशल लोबो यांच्या मार्गदर्शनाखाली आठवीतील विद्यार्थ्यानी या कार्यक्रमाची यशस्वी आखणी केली होती.
या महत्वाच्या दिवसाची सुरुवात शाळेची प्रार्थना गाऊन करण्यात आली.त्यानंतर आज साजरा होणाऱ्या संविधान दिवसाचे महत्व अधोरेखित करून संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले. संविधानाचा मानवी जीवनावर प्रकाश टाकणारी विचारप्रवर्तक नाटक, गाणी आणि भाषणे यावेळी मुलांनी, शिक्षकांनी सादर केली.संसद भवनात कामकाज कसे चालते हे विद्यार्थ्यानी यावेळी दाखविले आणि त्यासाठी संसद भवनाची प्रतिकृती निर्मिती, तर काही मुलांनी प्रत्यक्षात खासदार बनून संसदेत चालणाऱ्या कामावर प्रकाश टाकला.संविधानाचे जनक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला शाळेचे मुख्याध्यापक फादर निकी यांनी पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. विद्यार्थ्यांसाठी राज्यघटना आणि त्यातील प्रमुख तरतुदी यावर आधारित प्रश्न मंजुषा देखील घेण्यात आली.
या उपक्रमामुळे उपस्थित विद्यार्थी,पालक, शिक्षक यांना लोकशाही प्रक्रिया आणि जबाबदार नागरिकत्वाची मूल्ये समजण्यास मदत झाली.संविधान शपथ सर्वांनी घेतली.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.मुख्याध्यापक फादर निकी, उपमुख्यध्यापिका रोझ लोबो, पर्यवेक्षक फिलिप रॉड्रिग्ज आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.