भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे प्रतिवर्षाप्रमाणे परमपूज्य श्री काशिनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीराम मंदिर शुक्रवार पेठ येथे सात दिवसाचा भजन व श्रीराम जय राम जय जय राम रामनाम सप्ताह सुरू झालेला आहे .
या सात दिवसांत अखंड नामस्मरण आणि दररोज भजन सुरू असून बुधवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ९:०० वाजता ख्यातनाम कीर्तनकार संदीप बुवा मांडके यांचे सुमधुर श्रवणीय कीर्तन आयोजित करण्यात आलेले आहे.
त्यांना तबला अमेय हर्डीकर हार्मोनियम वैभव केंगार पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे साथसंगत करणार आहेत.तसेच २१ नोव्हेंबर गुरुवारी सकाळी ६:०० वाजता समाधीवर पुष्पवृष्टी होऊन महाप्रसाद संपन्न होणार आहे.
तरी महाराजांचे शिष्यवर्ग भाळवणी आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक रामनाम प्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक श्रीराम मंदिर ट्रस्ट व अरुणोदय सेवा न्यासाचे कल्याण कलढोणे शंकर कलढोणे.यांनी केले आहे