मुंबई प्रतिनिधी सुभाष मुळे
जोगेश्वरी मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक आणि तेज न्यूज चे पत्रकार गणेश हिरवे यांना प्रेरणा फाऊंडेशन यांच्या वतीने दिनांक १५ डिसेंबर रोजी कल्याण येथे अत्रे सभगृहात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती प्रेरणा फाऊंडेशन चे आधारस्तंभ प्रेरणा दीप्ती गावकर कुलकर्णी यांनी कळविले आहे.
हिरवे यांचे काम चांगले असून नेहमीच ते सामजिक कार्यात दंग असतात.आतापर्यंत त्यांना विविध संस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून १२७ पुरस्कार मिळालेले असून आजही त्यांचे काम सुरळीतपणे रुरूच आहे.आजपर्यंत तळागाळातील विविध विद्यार्थी, वंचित कुटुंब, रोजंदारीवर काम करणारे, गोर गरीब यांना मदत करण्यासाठी ते पुढाकार घेत असतात.त्यांनी ३६ वेळा रक्तदान आणि १७ वेळा प्लेटलेट्स दान केले असून मृत्यूपश्चात देहदान अवयवदान करण्याचा संकल्प सोडला आहे.पुस्तक आणि कापडी पिशवी मोफत वाटण्याचा अनोखा छंद त्यांनी जोपासला आहे. करोना काळात देखील त्यांनी पुढाकार घेऊन आरोग्य किट,किराणा किट, सनिटयझर, मास्क हजारोंना दिले होते.विद्यार्थीप्रिय आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून त्यांची समाजात ख्याती असून २५ वर्षांपासून वृत्तपत्र लेखक पत्रकार म्हणून देखील ते कार्यरत आहेत.नागरी समस्या सोडविण्यासाठी देखील ते कायमच पुढाकार घेत असतात.
पुरस्कार जाहीर झाल्याने अनेकांनी हिरवे गुरुजींचे अभिनंदन केलं असून त्यांना पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.अशा व्यक्तींचा समाजाला अभिनव असल्याचे प्रेरणा गावकर यांनी सांगितलं.