कारखान्याच्या 25 व्या गळीत हंगामाचा प्रारंभ
भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाने यंदाच्या गळीत हंगामात चार ते साडेचार लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट् ठेवलेले आहे. व्यवस्थापनाचे हे उद्दिष्ट् साध्य करण्यासाठी व ऊस पुरवठादार शेतकरी, ऊस तोडणी व वाहतुक कंत्राटदार, हितचिंतक, कार्यकर्ते, कारखान्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपूर्ण सहकार्य करुन यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करावा, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी केले.*
कारखान्याच्या 2024-25 च्या 25 व्या गळीत हंगाम शुभारंभ कल्याणराव काळे व त्यांच्या सुविद्यपत्नी सौ.संगिताताई काळे व संचालक मंडळ यांच्याहस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी कारखान्याचे संचालक व आढिव येथील भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शंकर महाराज चव्हाण होते, त्यावेळी प्रसंगी ते बोलत होते. तत्पुर्वी संचालक सुनिल पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.पुनमताई पाटील या उभयतांच्या शुभहस्ते गव्हाण व काटापुजन करण्यात आले व श्रीविठ्ठल व सहकार शिरोमणी वसंतदादांच्या प्रतिमेचे पुजन हणुमंत काळे-वेदपाठक व शंकरमहाराज चव्हाण यांचेहस्ते करण्यात आले.
कल्याणराव काळे पुढे म्हणाले, स्व्. वसंतदादांनी आपल्या अथक परिश्रमातुन कारखान्याची उभारणी केली. त्यांना तत्कालीन अनेक सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले. गेल्या पंचवीस वर्षात कारखान्याने यशस्वी घोडदौड सुरु ठेवली आहे. अनेक बरे वाईट अनुभव आले, गेल्या पाच-सहा वर्षात कारखाना अडचणीतून मार्गक्रम करीत असताना प्रसंगी तोटा सहन करुन ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना एफआरपी पेक्षा जास्त् आणि इतर कारखान्याच्या बरोबरीने ऊस दर देण्याची जबाबदारी पार पाडली. यंदाच्या हंगामातही ऊस दरात इतर कारखान्याच्या तुलनेत ऊस दर देण्यास आम्ही कमी पडणार नाही. दैनंदिन चार ते साडेचार हजार मे.टन गळीत होण्यासाठी ऊस तोडणी व वाहतुक यंत्रणा उभी केली आहे. तसेच कारखान्याच्या सर्व विभागांचा मेंन्टनन्स् पर्ण झाला आहे. आर्थिक अडचणीतही संचालक मंडळाने आपली जबाबदारी पुर्ण केली आहे. आता कारखान्याला आपला संपुर्ण ऊस देवुन, यंदाचा गाळप हंगाम यशस्वी करण्याची जबाबदारी ऊस पुरवठादार सभासद शेतकऱ्यांची आहे. ही जबाबदारी ऊस उत्पादक शेतकरी पार पाडेल, अशी अपेक्षा व्यक्त् करुन कल्याणराव काळे यांनी 34 टक्के प्रमाणे गत हंगामातील ऊस तोडणी वाहतुकदाराचा फरक, पाडव्याला 50 किलो साखर, कर्मचाऱ्यांचे पगार लवकरच देणार असल्याचे शेवटी सांगितले.
शंकर महाराज चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात कल्याणराव काळे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची सुरु असलेली घोडदौड कौतुकास्पद असल्याचे सांगुन, गळीत हंगामास शुभेच्छा दिल्या. स्वागत व प्रास्ताविक कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक पोपटराव घोगरे यांनी केले. कारखान्याच्या नवनियुक्त् तज्ञ संचालकांचा सत्कार संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आला. सुत्रसंचालन प्रा.समाधान काळे यांनी केले तर आभार संचालक योगेश ताड यांनी मानले.
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन भारत कोळेकर, संचालक मोहन नागटिळक, गोरख जाधव, आण्णा शिंदे, दिनकर कदम, योगेश ताड, युवराज दगडे, परमेश्वर लामकाने, जयसिंह देशमुख, संतोषकुमार भोसले, अरुण नलवडे, अमोल माने, राजाभाऊ माने, सुरेश देठे, संचालिका उषाताई माने, संगिताताई देठे, विश्वास उपासे, भारत आंबुले, विक्रमसिंह बागल, जोतीराम पोरे, दिकर डोंगरे, बाळु माने, माजी संचालक, इब्राहिम मुलाणी, काका म्हेत्रे, दिलीप हिंगमिरे, विलास जगदाळे, भाळवणीचे सरपंच रणजीत जाधव, निशिगंधा सहकारी बँकेचे सिईओ कैलास शिर्के, विठ्ठल सह.साखर कारखान्याचे माजी संचालक उत्तमकाका नाईकनवरे, यशवंत नागरी सह.बँकेचे चेअरमन शहाजी साळुंखे, प्रतिभादेवी नागरी सह.पतसंस्थेचे माजी चेअरमन विष्णु यलमार, हणमंत काळे-वेदपाठक , जनकल्याण हॉस्पीटलचे डॉ.सुधिर शिनगारे, अनिल नागटिळक, धनाजी कवडे, नारायण गायकवाड, नारायण शिंदे ,सभासद शेतकरी, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार व कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कल्याणराव काळे यांच्यामध्ये अडचणीतुन मार्ग काढयाची ताकद- सौ.संगिताताई काळे
साखर कारखाना, कारखान्याचे ऊस पुरवठादार सभासद शेतकरी, ऊस तोडणी व वाहतुकदार, कर्मचारी अधिकारी, कार्यकर्ते यांच्या सर्वांगीण हितासाठी कल्याणराव काळे यांची चालु असलेली धडपड, संघर्ष, धावपळ जवळुन पाहणाऱ्या व त्यांच्या संघर्षाची साक्षीदार असलेल्या सौ.संगिताताई काळे यांनी आपल्या एकाच शायरीत कल्याणराव काळे यांच्या कार्यकतृत्वाचे वर्णन केले.
त्यावेळी काळे म्हणाल्या " मुष्कींलें हमेशा बेहतरींन लोगोंके हिस्से में आतीं है क्योंकी, वह लोगही उसे बेहतरीन तरीकेसे अंजाम देने की ताकत रखते हैं.”
आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच ही ताकत कल्याणराव काळे यांच्यामध्ये असल्यामुळे अडचणीतही हा कारखाना व्यवस्थीत पुढे चालु आहे, असे सांगुन सौ.संगिताताई काळे यांनी यंदाच्या गळीत हंगामाच्या यशस्वीतेसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.