पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज अमोल कुलकर्णी
सोलापूर जिल्हा ग्रामीण तीर्थक्षेत्र असणाऱ्या श्री सीताराम महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याची सांगता अमावस्येला झाली.यात्रेवेळी जवळपास 2 लाख भाविकांनी समाधीचे दर्शन घेतले.कोल्हापूर सांगली कर्नाटक सोलापूर जिल्ह्यातील भाविकांनी उपस्थिती लावली.बाहेर गावाहून पै पाहुणे,लेकी जावई, मुलांबाळसह गाव फुलून गेला होता.खेळणी घरगूती वापरांच्या वस्तूंची मोठी उलाढाल झाली.दुपारी 12:30 वा समाधी वर पुष्पवर्षाव करण्यात आला.पंचकट्यावर शिधा जमा करण्यात आला.
यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.पांडुरंग परिवाराचे प्रमुख प्रशांत परिचारक,पंढरपूर मंगळवेढा मतदार आमदार समाधान अवताडे,शहर विकास आघाडीचे प्रमुख उमेश परिचारक, युवा नेते प्रणव परिचारक शिवाजी रोंगे सरपंच मनीषा सव्वाशे, उपसरपंच शरद रोंगे आदींसह अनेक राजकीय व्यक्तींनी दर्शन घेतले.श्रींची पालखी गावातून शोभेच्या दारूकामाने नगरप्रदक्षिणा करून गाणगापूर प्रस्थान ठेवले.
यावेळी मुख्य विस्वस्त हरिभाऊ कुलकर्णी,अध्यक्ष दीपक रोंगे,बापू केसकर, पालखी सोहळा प्रमुख विकास कुलकर्णी लक्ष्मण रोंगे,अशोक पाटील,दत्ता पाटील,दत्ता यादव,अभिजित आबा रोंगे,हणमंत केसकर,चैतन्य केसकर,बाळू मोकाशी,किरण मोकाशी, उपस्थित होते.सांगोला पंढरपूर येथून विशेष यात्रा बसची सोय करण्यात आली होती.समस्त ग्रामस्थांच्या वतीने यात्रा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.पालखी मंगळवेढा, अक्कलकोट मार्गे गाणगापूर जाणार आहे.