मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
मुंबई दादर छत्रपती शिवाजी महाराज मंदिर नाट्यगृह येथे दिनांक 24 /11/ 2024 रोजी लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या चौदाव्या स्मृतिदिनानिमित्त लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर आणि लोकशाहीर विठ्ठल उमप लोककला अकादमीच्या वतीने दिला जाणारा लोककला प्रबोधन पुरस्कार 2024 लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या नावाने दिला जाणारा जाणाऱ्या पुरस्काराने शाहीर सुभाष गोरे यांना सन्मानित करण्यात आले.
लोकशाहीर विठ्ठल उमप हे लोककलेतील चालते बोलते विद्यापीठ होते लोककलेतील ख्यातनाम कलावंत म्हणून त्यांची ख्याती होती त्यांची लोकशाहीर लोककवी म्हणून त्यांनी लिहिलेले गाणी भीमगीतं लोकगीतं कोळीगीत गोंधळ जांभूळ आख्यान आजही आज रामर राहिली आहेत आपली महाराष्ट्राची लोककला त्यांनी परदेशातही कोसोदूर पोहोचवली अनेक चित्रपटातही पार्श्वगायन केले शेवटी लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी गात गात जय भीम च्या नाऱ्याने नागपूरच्या दीक्षाभूमीवर अखेरचा श्वास लोककलेच्या मंचावर सोडला अशा महान लोकशाहीराच्या नावाने दिला जाणारा लोककला प्रबोधन पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जवळा येथील शाहीर सुभाष गोरे यांना दिला.
शाहीर सुभाष गोरे यांनी वयाच्या तेरा वर्षांपासून आज तागायत वयाच्या 62 वर्षापर्यंतचा लोककलेतला प्रवास फार खडतर आहे हालाकीच्या परिस्थितीतून लोककला जतन व संवर्धन करीत असताना परदेशासह महाराष्ट्रभर शाहीर गोरे यांनी आपली लोककला शाहिरी पोवाडे, गोंधळ, वाघ्या मुरळी, भारुड, वासुदेव, लावणी, तमाशा, कोळी नृत्य, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, दक्षिण क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर, दिवदमन, गुजरात, कोलकत्ता, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, मसूरी, डेहराडून, दिल्ली, म्हैसूर, गोवा, येथे लोककला सादर केली आहे विविध लोककला महोत्सवात सहभाग नोंदवला आहे लोककला स्पर्धा, लोककलावंत शिबिर, लोककलावंत परिषद, विविध सांस्कृतिक कला महोत्सव, आयोजित करून लोककला जतन व संवर्धन केली आहे व करीत आहेत, महाराष्ट्राच्या लोककलेत मोलाचे योगदान शाहीर गोरे यांचे राहिले आहे शाहीर सुभाष गोरे हे लोककलेतील अष्टपैलू कलावंत म्हणून त्यांचे नाव लौकिक आहे.
तमाशा या लोककलेत सरदार, ढोलकी, मावशी, सोंगाड्या, हार्मोनियम, ही भूमिका लोककला सादर केली आहे तमाशा सम्राट गुलाबराव ढालेवाडीकर, शाहीर राजा पाटील कवठेमहांकाळकर, शाहीर वामन पाटोळे, शाहीर नंदकुमार पाटोळे, गौतमी सातपुते तावशीकर, वामन शिरगावकर, सुमन पंढरपूरकर, शाहीर ईश्वर पिंपरीकर, शाहीर संजय हिवरे पुरदांवडेकर आदि तमाशा फडात आपली लोककला सादर केली आहे पारंपारिक गोंधळात कधी संबळ, वाघ्या मुरळीत कधी दिमडी, कधी भेदिक शाहीर, कधी राष्ट्रीय शाहीर, कधी भारुड सम्राज्ञी चंदाताई तिवाडी यांचे सहकारी कलावंत म्हणून सहभाग कधी कोळी नृत्य सादर केले आहे.
अशा हरहुन्नरी कलावंताला या अगोदर जीवनगौरव, कलाभूषण, कलारत्न, समाजरत्न, आदर्श शाहीर, आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे याचीच दखल घेऊन लोककलेतल्या योगदानाबद्दल लोकशाहीर विठ्ठल उमप अकादमीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शाहीर संदेशजी उमप यांनी मुंबई दादर छत्रपती शिवाजी महाराज मंदिर नाट्यगृह येथे सन्मानपूर्वक लोककलेतील मानाचा मानला जाणारा लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या नावाचा 2024 चा लोककला प्रबोधन पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केला.
याप्रसंगी डॉ. विजय जी कदम, महेंद्र उबाळे साहेब,ॲड. संघराज रुपवते, माजी न्यायाधिश डि,के, सोनवणे, नितीनजी निकाळे, प्रवीण जी गांगुर्डे साहेब, विवेकानंद निकाळे, शुक्राचार्य गायकवाडजी, किशोर धोंडे, वनिताजी वाघमारे, सुमितजी जाधव, डॉक्टर स्वप्नील जी ढसाळ, डॉक्टर संगीताजी ढसाळ, पुरस्कारार्थी ज्योती पाठक, अरविंद जाधव, शरद संकपाळ, राजू जाधव, राजेंद्र बनसोडे, मुंबई आर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव , शाहीर प्रवीण जी फणसे , आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला लोककला प्रबोधन पुरस्कार मिळाल्याबद्दल शाहीर सुभाष गोरे यांचे महाराष्ट्रातून मान्यवर कलावंताकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
जवळा ग्रामपंचायत ग्रामस्थ सरपंच, माजी आमदार दिपक आबा साळुंखे पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयमालाताई गायकवाड, यशोजिवन हॉस्पिटल सांगोला डॉक्टर पियुष साळुंखे पाटील, यांनी शुभेच्छा दिल्या.