माढा प्रतिनिधी तेज न्यूज
माढा स्वाभिमानी शेतकरी संघटना पाठिंबा आज सकाळी भीमानगर येथे स्वाभिमानाची बैठक झाली, त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊसाचा काटा व उच्चांकी दर देण्याचे तीन वर्षे झाली काम करत असलेले अभिजीत आबा पाटील यांना एकमुखी पाठींबा देण्याचा निर्णय झाला आहे.तसेच माढा तालुक्यातील सर्व जनता अभिजित पाटील यांच्या प्रचारार्थ सहभागी होऊन उदंड प्रतिसाद देत आहेत.
यावेळी स्वाभिमानीचे नेते विठ्ठलचे संचालक सचिन पाटील, ज्येष्ठ नेते शिवाजी भाऊ पाटील, युवा नेते प्रशांत पाटील, अजिनाथ पराबत, प्रताप पिसाळ, सत्यवान गायकवाड, अतकर सर, विष्णु कुंभार,आबा कुंभार तसेच संजय बाबा कोकाटे, नितीन बापू कापसे, बाळासाहेब पाटील यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.