भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील रविवार पेठ येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्तिक प्रबोधनी एकादशी निमित्त महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. हे महापूजा सौ व श्री प्रशांत श्रीकांत माळवदे यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
यावेळी श्री संत नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन दादा आगलावे यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रवीण शिंदे भाळवणी गावचे उपसरपंच नितीन शिंदे,आनंद देशपांडे, दादा आगलावे, नानासो जाधव, रवींद्र कारंडे, सुधीर गांधी, सुनील माने,बाळासाहेब कलढोणे, सदाशिव वाघमारे,पुरुषोत्तम शिंदे जालिंदर शिंदे,विठ्ठल लोखंडे,आबा लोखंडे,संतोष सावंत, आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रामलिंग नागणे यांच्या वतीने भावीक भक्तांना साबुदाणा खिचडीची वाटप करण्यात आले.यावेळी महिला मोठया प्रमाणात उपस्थित होत्या.