भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
सर्व भाविकांना कळविण्यास येते कि, दरवर्षी प्रमाणे या वर्षी परम पूज्य सदगुरू काशिनाथ महाराज यांची पुण्यतिथी निमीत्त शुक्रवार कार्तिक पौर्णिमा दिनांक १५/११/२४ पासून बुधवार दिनांक २०/११/२४ पर्यंत श्रीराम मंदिर भाळवणी येथे " श्रीराम जयराम जय जय राम " या मंत्राचा जप आयोजित केला आहे .
दररोज सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत नित्य पूजा आणि आरती व तीर्थप्रसाद संध्याकाळी सहा ते सात आरती व तीर्थप्रसाद आयोजित करण्यात आला आहे.
विशेष कार्यक्रम बुधवार दिनांक २०/११/२४ रोजी रात्रौ ९ वाजता हरि भक्त परायण श्री संदीप मांडके महाराज पुणे यांचे सुश्राव्य नारदीय कीर्तन होईल.
गुरुवार २१//११/२४ सकाळी सूर्योदय समयी पुष्पवृष्टी करून पुण्यतिथी सोहळा होईल
त्या नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती कल्याण कलढोणे यांनी केली आहे.