पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
‘तारापूर (पालघर) येथील न्युक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एन.पी.सी.आय.एल), मुंबई येथील भाभा अणुसंशोधन केंद्र (बी.ए.आर.सी) आणि गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील ‘स्वेरी’ तथा श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर यांच्यात नुकताच त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे’, अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव तथा स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली.
न्युक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एन.पी.सी.आय.एल), तारापूर, भाभा अणुसंशोधन केंद्र (बी.ए.आर.सी), मुंबई आणि श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी), पंढरपूर यांच्यात नुकताच हा त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून उद्योजकता विकासास गती देणे, संशोधन आणि प्रशिक्षणाला प्रोत्साहन देणे तसेच ग्रामीण भागाच्या विकासासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राच्या तंत्रज्ञानाचा प्रसार करणे या बाबींचा समावेश आहे. त्यासोबतच संयुक्त संशोधन प्रकल्प हाती घेणे, कौशल्य विकासासाठी विविध उपक्रम राबवणे आणि तंत्रज्ञान हस्तांतरण या प्रमुख बाबींचा देखील या सामंजस्य करारात समावेश आहे. या कराराच्या माध्यमातून भाभा अणुसंशोधन केंद्राच्या संशोधन सुविधा, न्युक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एन.पी.सी.आय.एल) च्या निधीचा आणि स्वेरीच्या कार्यप्रणाली तथा कार्य कौशल्यांचा मिलाप करून तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि प्रगतीसाठी चालना मिळणार आहे.
हा महत्वपूर्ण सामंजस्य करार श्री. आर. एस. सावंत (साइट डायरेक्टर, एन.पी.सी.आय.एल., तारापूर), डॉ.एस.अधिकारी (संचालक, केएमजी, बी.ए.आर.सी., मुंबई), श्री. सूरज रोंगे (विश्वस्त, स्वेरी, पंढरपूर), श्री. प्रमोद कुमार मिश्रा (अध्यक्ष, सी.एस.आर., एन.पी.सी.आय.एल., तारापूर), श्री. डॅनियल बाबू (प्रमुख टीटी अँड सीडी, बी.ए.आर.सी., मुंबई), श्रीमती. भारती भालेराव (आकृती ग्रुप लीडर, टीटी अँड सीडी, केएमजी, बी.ए.आर.सी., मुंबई), श्री. प्रहुपद दास (सदस्य-सचिव, सी.एस.आर., एन.पी.सी.आय.एल., तारापूर), डॉ. आर. एस. पवार (प्रकल्प कार्यकारी अधिकारी, आकृती केंद्र, तारापूर) आणि डॉ. आर. आर. गिड्डे (प्रशासन अधिष्ठाता, स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस), पंढरपूर) या मान्यवरांच्या उपस्थितीत व स्वाक्ष-यांसह करण्यात आला. हा महत्वपूर्ण करार झाल्याबद्दल स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख, सर्व विश्वस्त व पदाधिकारी, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम.जी.मणियार, डी. फार्मसीचे प्राचार्य. प्रा. एस.व्ही. मांडवे, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.