पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून तसेच वृतपत्र विक्रेता दिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे शहरातील वृतपत्र विक्रेत्यांचा गौरव करण्यात आला.
शहरातील तिसऱ्या पिढीत वृतपत्र व्यवसाय करीत असलेले हरिदास पेपर स्टाॅलचे संचालक ज्ञानेश हरिदास, मागील तीस वर्षापासून वृतपत्र विक्रेत्याचा व्यवसाय करीत असलेले नंदकुमार देशपांडे, संतोष कुलकर्णी, बाळासाहेब बेसुळके,शिरिष तेंडुलकर, गोरख भिलारे, इ.चा गौरव अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास, जिल्हा सचिव सुहास निकते, तालुका सदस्य सतिश निपाणकर यांनी करून त्यांना शुभेच्छा दिल्या.