पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
परिक्षेची पूर्वतयारी दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते कारण ते शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवासाची दिशा ठरवते. रोटरी क्लब ऑफ माढा व एमआयटी ज्युनिअर कॉलेज वाखरी पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने माढा परिसरातील इयत्ता दहावी च्या मुलांसाठी "परिक्षेची पूर्व तयारी" या विषयावर चर्चा सत्र पार पडले. यामध्ये बीजगणित भूमिती विषय तज्ञ श्री बडवे एन बी, श्री भंडारकवठेकर एन व्ही, इंग्रजी विषय तज्ञ श्री कुलकर्णी एस एम, विज्ञान व तंत्रज्ञान विषय तज्ञ श्री कंगळे वाय.के. यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यामध्ये मान्यवर तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना विविध समस्यांवर मार्गदर्शन केले.यामध्ये 1.अभ्यासाचे नियोजन कसे करावे?2.वेळापत्रक तयार करणे.
3.दररोज कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा.
4.महत्वाच्या विषयांना प्राधान्य देणे.
5.नियमित अभ्यासाची सवय लावने.
6.रोजचे विषय आणि गृहपाठ पूर्ण करने.
7.नोट्स बनवणे.
8.मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका सोडवणे.
9.आवड, क्षमता आणि भविष्यातील करियर योजना विचारात घेणे.
10.इंजिनीअरिंग, मेडिकल किंवा इतर व्यावसायिक अभ्यासक्रम करायचा असेल, तर प्रवेश परीक्षा आणि त्यांची तयारी याबद्दल माहिती घेणे.
11.योगा, ध्यान किंवा खेळ यासारख्या तणाव निवारक तंत्रांचा अवलंब करने.
12.स्वतःवर विश्वास ठेवने.
13.नेहमी सकारात्मक विचार करने .
14.आपण यशस्वी होऊ शकतो यावर विश्वास ठेवने.
15.मॉडेल प्रश्नपत्रिका सोडविणे.
16.विज्ञान, वाणिज्य, कला या शाखांमधील विविध करिअरच्या संधींबद्दल माहिती घेणे.
17.चांगला आहार, पुरेशी झोप, आणि व्यायाम यावर भर देणे .
18.शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखणे.
या व अशा अनेक विषयांवर सखोल मार्गदर्शन मिळाले.
या चर्चा सत्रासाठी रोटरी क्लब ऑफ माढा चे अध्यक्ष श्री सोमेश्वर तोंगळे, सचिव श्री सुभाष पाटील, एमआयटी ज्युनिअर कॉलेज वाखरी चे प्राचार्य डॉ स्वप्नील शेठ, मार्केटिंगचे श्री तानाजी डूबल सर यांनी परिश्रम घेतले.