पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
माढा विधानसभा मतदारसंघासाठी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील* यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाकडून यांच्या मातोश्री जयश्री पाटील व ह.भ.प.मधुकर महाराज नाईकनवरे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आला.
अभिजीत पाटलांनी नम्रपणा व संस्कार जपत विरोधी असलेले उमेदवार आमदार बबनदादा शिंदे व माजी आमदार विनायकराव पाटील व ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले.
आज दिनांक 28 ऑक्टोबर रोजी श्री विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले असता विरोधी उमेदवार आमदार बबनराव शिंदे हे देखील आपला अर्ज भरण्यासाठी आले असता.अभिजीत पाटीलानी संस्काराचे दर्शन घडविले.