भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील श्री भवानी देवीच्या यात्रेस आज पासून प्रारंभ झालेला आहे . हि यात्रा आज व उद्या दोन दिवस भरणार आहे. आज पहाटे श्री चे महापूजा करून आभिषेक करण्यात आला. संध्याकाळी महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच छबिनाची मिरवणुक आयोजित करण्यात आली आहे. गुरुवारी पहाटे श्रीच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रेनिमित्त लेझीम, गजी ढोल, धनगरी ओव्या भेदि गाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभागी होण्याचे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच भाळवणीसह पंचक्रोशीतील व्यापारी, भाविक, भक्तांनी या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन सरपंच रणजीत जाधव यांनी केले आहे.