खडकी प्रतिनिधी तेज न्यूज
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये अर्जुन मार्ग येथील स्टेट बँकेच्या समोरच्या पटांगणात झाला आहे. युवतीच्या वडिलांनी संबंधित युवकांला याबाबत जाब विचारले असता युवकांनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली असून युवतीने याबाबत खडकी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आशुतोष सिद्धार्थ तापकीर (वय 35, रा. डंकन रोड, स्टेट बँकेसमोर खडकी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रानुसार, एक युवती डंकन मार्गावरील स्टेट बँकेसमोर राहते. याच परिसरातील आशुतोष तापकीर हा दररोज युवतीचा पाठलाग करणे, अश्लील शेरेबाजी करणे, अश्लील हावभाव करणे असे प्रकार सुरू केले. युवतीने हा प्रकार तिच्या वडिलांना सांगितला, वडिलांनी याबाबत युवकांला विचारले असता त्यांनी अश्लील शिवीगाळ करीत हातपाय तोडून टाकेल अशी धमकी देत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत युवतीनें खडकी पोलिसात तक्रार दिली.
डंकन रोड, अर्जुन मार्गावर स्टेट बँक असून या स्टेट बँकेच्या समोरच्या पटांगणात व्यसनाधीन युवकांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दिवसभर हे युवक या ठिकाणी दारू पिणे, गांजा ओढणे आदी व्यसन करतात. या परिसरातील हे युवक असून सुमारे 30 ते 40 युवकांचा घोळका या ठिकाणी व्यसन करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सायंकाळच्या वेळेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर युवकांची गर्दी होते.
व्यसनाधीन युवकांनी व्यसन केल्यावर जोर जोरात बोलणे, भांडणे करणे, गलिच्छ भाषेत शिवीगाळ करणे असे प्रकार करून दहशत माजविण्याचा प्रकार सुरू आहेत. मोठ्या प्रमाणावर व्यसनाधिन युवकांचा वावर वाढला आहे. या व्यसनाधिन युवकांकडून अरेरावेची भाषा तसेच जोरजोरात बोलून भांडणामुळे रहवासी हतबल झाले आहेत. पोलीस प्रशासनाच्या वतीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रहवासी करीत आहेत.