विशेष लेख
आता शिवरायांचे नाव घेऊन समाज तोडायचा प्रयत्न
संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे तर भारताचे आराध्यदैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांबद्दल भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी अवमानकारक भाषा वापरली होती, शिवरायांना राजा न म्हणता लुटारू असे संबोधले होते.
*शिवरायांनी ज्या भगव्या ध्वजाच्या प्रेरणेने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या भगव्या ध्वजाला कायमच नाकारले,
*शिवरायांच्या मावळ्यांनी दिलेली हर हर महादेवची घोषणा म्हणजे हे काहीतरी धार्मिक आहे असे म्हणून त्याचा कायमच या नेत्यांनी धिक्कार केला,
*शिवरायांना केवळ एका जातीशी जोडण्याचाही प्रयत्न राजकारण्यांनी करून पाहिला,
*अलीकडच्या काळात छत्रपती शिवरायांनी केवळ हिंदू धर्म म्हणून काहीच केले नाही अशी सुद्धा भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला जातोय,
*छत्रपती शिवरायांनी स्वराज्य म्हणजे हिंदू धर्मियांचे राज्य स्थापन केले नाही तर सर्व धर्मीयांचे ते राज्य होते असाही असाही विचार अलीकडच्या काळात रुजविण्याचा प्रयत्न होतोय,
*छत्रपती शिवरायांनी हिंदू धर्मांतर्गत असणाऱ्या अठरापगड जातींना एक करण्याचे व त्यांच्या कल्याणाचे राज्य निर्माण करण्याचे शिवधनुष्य अथक परिश्रमाने पेलले, शिवरायांच्या या राज्यामध्ये अन्य धर्मीयांना जरूर सन्मान होता याचा अर्थ शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य नव्हते असा होत नाही.
परंतु धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारणाऱ्यांनी शिवराय कसे धर्मनिरपेक्ष होते हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवलाय, शिवराय खरंतर जाणता राजा होते याचाच अर्थ ते आपल्या धर्माचा अभिमान बाळगून इतर धर्मियांचा आदर करणारे होते. त्यामुळे त्यांना धर्मनिरपेक्ष राजा असे जोडण्याचे काहीच कारण नाही. परंतु धर्मनिरपेक्ष शब्द जोडला की ती व्यक्ती असो महापुरुष असो अथवा एखादी पक्ष - संघटना असो त्याला हिंदुत्वापासून दूर करण्याचा यातील उद्देश असतो.
आज घडवून आणलेल्या अनेक गोष्टींमधून व विशेषतः राजकारणातील व्यक्तींनी केलेल्या वक्तव्यांमधून शिवरायांना हिंदुत्वापासून बाजूला करण्याचा प्रयत्न केला जातोय. याचाच अर्थ हिंदू समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होतोय. ज्या शिवरायांनी हिंदू समाजाला संघटित केले त्याच शिवरायांचे नाव घेऊन आज दुर्दैवाने हिंदू समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होतोय. स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारणी खेळत असलेली ही खेळी समाजाने ओळखली पाहिजे व वेळीच जागे होऊन या वृत्तीचा धिक्कार केला पाहिजे.
- डॉ.सचिन वसंतराव लादे, पंढरपूर
मो.क्र.७५८८२१६५२६