सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल वतीने मयूर पंख ऑक्टोबर सेवा सप्ताह निमित्ताने रोशन प्रशालेमध्ये गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक योजना कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी डिस्ट्रिक्ट गंगाप्रसाद बंडेवार, लायन्स झोन चेअरमन विठ्ठल सारंगी,अध्यक्ष चक्रधर अन्नलदास लायन केदार स्वन्ने, लायन प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी, लायन चंद्रकांत रच्चा इत्यादी मान्यवरांचा रोशन प्रशालेच्या मुख्याध्यापक इंगळगी यांच्या हस्ते सत्कार करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रशालेतील शिक्षक शिक्षिका शिक्षक तर कर्मचारी उपस्थित होते.
चक्रधर अन्नलदास यांच्या प्रास्ताविका नंतर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लायन विठ्ठल सारंगी सरांनी लायन्स क्लब राबवीत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. वक्ते लायन,कोषाध्यक्ष ,इतिहास अभ्यासक व व्याख्याते प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी,यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना त्यांच्या जीवनात सर्वात मोठी गरज ते पाठ्यपुस्तके असतात ते गरिबी विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्याचे महान कार्य लायन चंद्रकांत रच्चा सर यांच्या दानत वृत्ती बद्दल गौरव गौरवोद्गार काढले.
लायन्स क्लब सोलापूर सेंट्रल आयोजित या उपक्रमाबद्दल धन्यवाद व्यक्त केले विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अनेक अडचणीवर ,परिस्थितीवर मात करून वाचन मनन चिंतनाच्या जोरावर खूप खूप शिकून आपल्या आई-वडिलांचे व शाळेचे नाव लौकिक करावे असे आव्हान केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशालेच्या समीर मळ्ळी यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आदींचे बहुमोल सहकार्य लाभले.