पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
नुकतीच खांडवी येथे पार पडलेले जिल्हास्तरीय निवड चाचणी यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला होता यामध्ये शिवरत्न जुनिअर कॉलेज गादेगाव मधील सानिका केराप्पा बागल हीच निवड झाली असून बुलढाणा शेगाव येथे राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धा पार पडणार आहेत . राज्यस्तरीय आटपट्या स्पर्धेनंतर पुढील स्पर्धा तामिळनाडू येथे होणार आहेत यावेळी जिल्ह्यातील 17 वर्षाखालील मुलींचा संघ निवडण्यात आला.
या यशस्वी वाटचालीसाठी संस्थेचे मार्गदर्शक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर, संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे ,आट्यापाट्याचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कापसे, उपाध्यक्ष राजेंद्र मुंबरे, यांनी अभिनंदन केले त्याचबरोबर खांडवीचे संभाजी घाडगे, मल्हार भुसनर ,जगन्नाथ ओहाळ, दत्ता झांबरे सहशिक्षक राजेंद्र मोलाणे, दीपक देशमुख ,वर्षा मोरे ,शितल बागल ,लीना बागल ,शीतल मस्के ,अजय मोरे ,सीमा रकटे ,नसरुद्दीन पटेल ,सोमनाथ भुईटे ,नियाज मुलाणी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
त्याचबरोबर नुकत्याच जिल्हास्तरीय राजबॉल स्पर्धा पार पडल्या यामध्ये शिवरत्न ज्युनिअर कॉलेजमधील मुलींचे संघाने विभागीय स्पर्धेमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे .
नुकत्याच पार पडलेल्या या मैदानी स्पर्धेमध्ये सुमित माने जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला.