पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये शुक्रवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रथम वर्ष अभियांञिकी विभागाचा पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या पालक मेळाव्याचे उद्घाटन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, पालक प्रतिनीधी म्हणून प्रा. प्रकाश पाटील व प्रा. निता पवार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, प्रथम वर्ष अभियांञिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दरम्यान प्रथम वर्ष अभियांञिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम यांनी उपस्थित पालकांसमोर विभागाचा लेखाजोखा मांडला. यामध्ये शासनाकडून मिळणारी शिष्यवृत्ती, युटीन टेस्ट, पालक विद्यार्थी-संवाद, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती, मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळणे आवश्यक, अभ्यासात सातत्य, महाविद्यालयात वेळेत उपस्थिती राहणे आवश्यक असल्याबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन प्रा. अनिल निकम यांनी सांगितले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी पालकांसमोर बोलताना म्हणाले, यापूर्वीच्या परीक्षा आणि इंजिनिअरिंगच्या परीक्षा यामध्ये खुप फरक आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी वर्गातील उपस्थित राहणे आवश्यक आहेच त्याचबरोबर मेन्टंली आपली उपस्थित शिक्षक शिकवत असताना वर्गात असणे गरजेचे असल्याचे मत डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर बोलतात म्हणाले, सर्वाधिक नामांकित कंपन्या ह्या सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये येत आहेत. इंडस्ट्रियल विद्यार्थ्यांची निवड करत असताना स्किल पाहिले जाते. यासाठी विद्यार्थ्यांकडे इंग्लिश संभाषण असणे आवश्यक आहे. कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट होणेसाठी महाविद्यालयात जापनीज भाषेतील प्रशिक्षण देण्यात येत असते. याशिवाय फाॅरेन लँग्वेज देखील विद्यार्थ्यांना येणे आवश्यक आहे.
पालक प्रतिनिधी प्रा. प्रकाश पाटील व प्रा. निता पवार यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी पालकांच्या सुचना लक्षात घेऊन विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिली.
या पालक मेळाव्याचे सुञसंचलन प्रा. शिवाजी पवार यांनी केले तर उपस्थित पालकांचे आभार डाॅ. संपत देशमुख यांनी मानले. हा मेळावा यशस्वी होणेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.