!! ख्यातनाम गायक अतुल खांडेकर यांचे रसाळ सुमधुर स्वरांनी रसिक तृप्त !!
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने आयोजित सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके साहेब आणि सर्व सन्माननीय सदस्य आणि व्यवस्थापक मनोज श्रोत्री साहेब यांच्या अथक परिश्रमातून प्रतिवर्षाप्रमाणे श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवाच तिसरे स्वरपुष्प ओंकार कला अकादमी चेन्नई चे विद्यार्थी आणि अतुल खांडेकर यांनी गुंफले.सुरुवातीला मंदिर समितीचे सदस्या शकुंतला नडगिरे मॅडम व्यवस्थापक मनोज श्रोत्री साहेब श्री व सौ अर्चना श्रीधर मनी.अवंतिका पाटील.यांचे शुभहस्ते दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली पहिल्या सत्रात सुरुवातीला चेन्नई येथील ओंकार कला अकादमीच्या लहान विद्यार्थिनीनी अतिशय सुंदर अभंग गायन सादर केले.त्यामध्ये सुंदर ते ध्यान.चला आळंदीला जाऊ.तिर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल.येई ओ विठ्ठले.माझे मनोरथ पूर्ण करी देवा.माझे माहेर पंढरी.आणि कानडी तामिळी अभंग गात करत पंढरपूरकर रसिकांची मने तर जिंकलीच.लहान वयात अतिशय सुरेल सराव केला असल्याचे जाणवले.जणू बालमुखातुन विठ्ठलच गात असल्याचा भास होत होता.त्यांना तितकाच रसिकांनी ही टाळ्यांचा कडकडाटात उदंड प्रतिसाद दिला. त्यांना तबला साथ सबरीश पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे हार्मोनियम रंगराजन यांनी केली तर दुसऱ्या सत्रात विदुषी विणा सहस्रबुद्धे यांचे शिष्य ख्यातनाम गायक अतुल खांडेकर यांच्या गायनाला सुरुवात झाली.त्यामध्ये त्यांनी नाम संकीर्तन साधन पै सोपे.देह जावो अथवा राहो.कृष्णे वेधिली विरहिणी बोले.चल मना संतांच्या बागेत.पांडूरंग अष्टक.पुष्पांजलीने आणि अगा वैंकुठीच्या राया भैरवीने कार्यक्रमाची सांगता केली त्यांना हार्मोनियम लीलाधर चक्रदेव पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे तबला माऊली खरात टिळक सुदर्शन कुंभार स्वरसाज पार्थ कुलकर्णी यांनी केली.सर्व पंढरपूरकर रसिक मोठ्या संख्येने शेवट पर्यंत श्रोत्यांनी भरभरुन प्रतिसाद देत सर्वांना मंत्रमुग्ध केले.तर सुत्रसंचलन विक्रम बिस्किटे यांनी केले.
पुढेही ५ दिवस चालणाऱ्या या संगीत महोत्सवात ख्यातनाम गायक गायिका यांची उपस्थिती असणार असून दररोज सर्व रसिक श्रोत्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने करण्यात आले आहे.संगीत महोत्सव यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचारी अधिक परिश्रम घेत आहेत.